DGP, SP पासून SHO पर्यंत तुम्हाला या पोलिसांच्या पदांचे फुल फॉर्म माहिती आहेत का? | Police all post full form in Marathi
DGP, SP, SP, IG, ASP पासून SHO पर्यंत पोलिसांच्या पदांची ही शॉर्ट नाव तुम्ही नेहमीच ऐकता, परंतु भरपूर लोकांना या पदांचा ॲक्च्युअल फुल फॉर्म माहिती नसतं, म्हणूनच आजच्या या Police all post full form in Marathi लेखात मी तुमच्यासाठी या सर्व पदांचा फुल फॉर्म मी आज सांगणार आहे.
Police all post full form in Marathi
DGP: डीजीपी चे फुल फॉर्म आहे Director General of Police. मराठी मध्ये या पदाला पोलीस महासंचालक असे म्हणतात. राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशासाठी डीजीपी हे पद सर्वात मोठे पद असते. खूप वर्षांच्या अनुभवानंतर आयपीएस अधिकाऱ्याला डीजीपी हे पद दिले जाते.
मानचिन्ह
ADGP: एडीजीपी चे फुल फॉर्म आहे Additional Director General of Police. मराठी मध्ये या पोस्ट ला अतिरिक्त पोलीस महासंचालक असे म्हणतात. या पदावर देखील आयपीएस अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते एडीजीपी हे एडीजीपी च्या खालच्या rank चे असतात आणि आयजीपी अधिकाऱ्याचे सीनियर असतात.
मानचिन्ह
IGP: आईजीपी चे फुल फॉर्म आहे inspector-general of police. मराठी मध्ये या अधिकाऱ्याला पोलिस महानिरीक्षक असे म्हणतात. हे राज्यातील पोलिसांचे तिसरे सर्वात मोठे पद आहे आय. जी. पी. या पदावर देखील आयपीएस अधिकाऱ्यांची खूप साऱ्या वर्षांच्या अनुभवानंतर नेमणूक केली जाते.
मानचिन्ह
DIGP: डीआयजीपी चे फुल फॉर्म आहे Deputy inspector general of police. मराठी मध्ये या पोलीस पोस्ट ला पोलिस उपमहानिरीक्षक असे म्हणतात. आयजीपी च्या तुलनेत हे एक रँक खालचे अधिकारी असतात आणि डीआईजीपी, एसपी और एसएसपी या अधिकाऱ्यांचे सीनियर असतात.
मानचिन्ह
SP: एसपी चे फुल फॉर्म आहे Superintendent of Police. या पदाला मराठी मध्ये पोलीस अधीक्षक असे संबोधले जाते. हे एखाद्या राज्यातील जिल्ह्याचे मुख्य अधिकारी असतात.
मानचिन्ह
DCP: डीसीपी चे फुल फॉर्म आहे Deputy Commissioner of Police किंव्हा मराठी मध्ये पोलिस उपायुक्त. हे पोलीस आयुक्तालयातील एसपी दर्जाचे अधिकारी आहेत. DCP हा आयुक्तालयातील विभाग किंवा युनिटचा प्रमुख असतो.
मानचिन्ह
ASP: एएसपी चे फुल फॉर्म आहे Additional superintendent of police. या अधिकाऱ्याच्या पोस्ट ला मराठी मध्ये सहाय्यक पोलीस अधीक्षक असे म्हणतात. ASP ही रँक डीएसपीच्या समतुल्य असते. आयपीएस अधिकाऱ्यांना प्रोबेशन कालावधीत सुरुवातीची 2 वर्षे हे पद दिले जाते.
मानचिन्ह
SI: एसआई चे फुल फॉर्म आहे Sub-inspector. एसआय ही इन्स्पेक्टरच्या एक खालची रँक असते व असिस्टन्स सब इंस्पेक्टर चे हे सिनियर असतात. मराठी मध्ये या पोस्ट ला पोलिस उपनिरीक्षक असे म्हणतात.
मानचिन्ह
ASI: एएसआय चे फुल फॉर्म आहे Assistant Sub-inspector. मराठी मध्ये या पोस्ट ला सहायक पोलिस उपनिरीक्षक असे म्हणतात. असिस्टंट सब इंस्पेक्टर हे एएसआय हेड कॉन्स्टेबल चे सीनियर आणि सब इन्स्पेक्टर चे जूनियर असतात.
मानचिन्ह
SHO: एसएचओ चे फुल फॉर्म आहे Station House Officer. मराठी मध्ये पोलिस स्टेशनच कमांडर असे म्हणतात. एसएचओ ही एक रँक नसून एक पद आहे इन्स्पेक्टर किंवा सब इन्स्पेक्टर रँक ला असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला हे पद दिले जाते आणि SHO कडे एका पोलीस ठाण्याचे इन्चार्ज दिले जाते.
या सर्व वरिष्ठ पदानंतर हेड कांस्टेबल (HC) म्हणजे हवलदार, वरिष्ठ कांस्टेबल (SC) म्हणजे लांस नायक आणि पुलिस कांस्टेबल (PC) यांची पदे येतात.
मित्रांनो मला अशा आहे आता तुम्हाला आता DGP पासून कांस्टेबल पर्यंत सर्व पदांची माहिती आणि त्या पदांचे फुल फॉर्म समजले असतील, तरी सुद्धा तुम्हाला काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की विचारा.
Also Read