एमएसएमई म्हणजे काय? | MSME Full form in Marathi

एमएसएमई म्हणजे काय? | MSME Full form in Marathi

MSME बद्दल तुम्ही नक्कीच ऐकले असेल पण यासंबंधी पूर्ण माहिती कित्येकांना नसते, म्ह्णून MSME Full form in Marathi या लेखातून आम्ही तुमच्या साठी MSME संबंधी सविस्तर माहिती घेऊन आलो आहोत. MSME ही एक व्यवसाय क्षेत्रातील संज्ञा आहे. Ministry of MSME ही भारत सरकारची एक मंत्रालय संस्था आहे. या मंत्रालय माध्यमातून सूक्ष्म, लघु आणि मध्यम स्वरूपाच्या व्यवसायांना निर्मिती पासून तर पुढील कार्यासाठी आवश्यक नियमावली बनविली जाते.

What is Full Form of MSME in Marathi?

MSME शब्दाचा फुल फॉर्म हा Micro, Small and Medium Enterprises असा होतो. मराठी मध्ये MSME म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे मंत्रालय होय.

सूक्ष्म, लघु की मध्यम उद्योग कसा ठरवितात?

MSME मध्ये कोणते निर्मिती (Manufacturing) उद्योग येतात याविषयी त्या निर्मिती उद्योगातील खर्च आणि त्याचे भांडवल यावरून ठरविता येते. त्यासाठी खालील प्रमाणे काही निकश निर्धारित केलेले आहेत.

  • एखादा निर्मिती उद्योग हा सूक्ष्म उद्योग म्हणून तेव्हा ठरविला जातो जेव्हा त्या उद्योगातील भांडवल आणि खर्च हे 25 लाख रुपयांच्या वर जात नाही.
  • जेव्हा खर्च आणि भांडवल हे 25 लाख रुपयांच्या वर असते मात्र ते 5 करोड पेक्षा कमी होते तेव्हा त्या निर्मिती उद्योगाला लघु उद्योग म्हणून ओळखले जाते.
  • हाच खर्च आणि भांडवल जर 5 करोड पेक्षा जास्त आणि 10 करोड पेक्षा कमी असेल तर त्या निर्मिती उद्योगाला मध्यम उद्योगात समाविष्ट केले जाते.

उद्योग हा जर सेवा (Service) क्षेत्रातील असेल तर त्यासाठी वेगळे निकष आहेत.

  • उद्योगातील भांडवल गुंतवणूक ही जर १  करोड ते १ ० असेल तर त्या उद्योगाला सूक्ष्म उद्योग म्हणून ओळखले जाते.
  • जर भांडवल खर्च हा 10 लाख ते 2 करोड इतका असेल ते त्या व्यवसायाला लघु उद्योग म्हणून ओळखले जाते.
  • हाच भांडवल खर्च 2 करोड पासून 5 करोड पर्यंत असेल तर त्या सेवा उद्योगाला मध्यम उद्योग म्हणून ओळखले जाते.

MSME चे कार्य | Functions of MSMEs in Marathi

उद्योग मोठा आहे की छोटा हे त्याच्या भांडवलवरून ठरविले जाते. त्यासाठी काही नियम बनविणे गरजेचे असते कारण त्यामुळे उद्योगात सुसूत्रता आणि उद्योग वाढीस मदत होत असते.

  • MSME उद्योगांना प्रोत्साहन देणे
  • उद्योगांमध्ये चांगल्या अर्थाने स्पर्धा घडवून आणणे
  • उद्योगांना आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यासाठी प्रोत्साहित करणे
  • प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी लघु उद्योगांना चालना देणे
  • खादी आणि ग्राम उद्योगांना चालना देऊन त्यांच्या उद्योग वाढीसाठी मदत करणे.

MSME चे फायदे | Benefits of MSME in Marathi

MSME च्या माध्यमांतून संपूर्ण जगभरात सुधारणा घडत आहे. भारतातील सुधारणा विषयी बोलायचे असेल तर,

  • MSME मुळे गावाच्या जवळच रोजगार निर्मिती घडत आहे.
  • याचा फायदा एखाद्या मागासलेल्या भागात देखील रोजगार सुविधा आणि भागाची प्रगती यासाठी होतो आहे.
  • MSME मुळे दिवसेंदिवस रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत आणि त्यामुळे उद्योग व्यवसायांना चालना मिळत आहे.

FAQ

Q. MSME मंत्रालयचे मंत्री कोण आहेत?

A. Ministry of MSME म्हणजेच MSME मंत्रालयाचे विद्यमान मंत्री हे श्री जितन राम मांझी असून राज्यमंत्री या सुश्री शोभा कर्णदलजे या आहेत.

Q. भारतामध्ये किती MSME आहेत?

A. भारतामध्ये लाखोंमध्ये MSME आहेत, ज्यामुळे ते बिझनेस करण्याचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो

मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला आता MSME Full form in Marathi या लेखात दिलेल्या माहितीवरून MSME समजून घ्यायला मदत झाली असेल, तुमच्या काही शंका असतील तर खाली कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment