MCA full form in Marathi | एमसीए फुल फॉर्म इन मराठी
20व्या शतकामध्ये संगणकाचा शोध लागल्यानंतर संपूर्ण जगाचा कायापालट होण्यास सुरुवात झाली. 100 लोकांचे काम संगणक हा एकटा करू लागला. यानंतर संगणकामध्ये देखील बरेच मॉडिफिकेशन करण्यात आले. प्रत्येक कंपनीमध्ये संगणकाचा उपयोग होऊ लागला. परंतु सर्वांनाच संगणकाचे ज्ञान नसल्यामुळे, पूर्वी या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी खूप मागणी होती.
जसजसा काळ पुढे सरकला तस तसे वेगवेगळ्या प्रकारचे संगणकीय नॉलेज देणारे कोर्सेस विद्यापीठांमध्ये शिकवले जाऊ लागले. जेणेकरून तरुणांना या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
दहावी आणि बारावी झाल्यानंतर बरेच लोक पुढे संगणक क्षेत्रामध्ये ज्ञान संपादित करू इच्छितात. आपल्या भारतामध्ये विद्यार्थी BCA आणि MCA हा पर्याय निवडताना दिसतात. BCA हा पदवी अभ्यासक्रम असून MCA हा पदव्युत्तर दोन वर्षांचा अभ्यासक्रम आहे. परंतु मित्रांनो तुम्हाला MCA चा फुल फॉर्म माहिती आहे का?
आजच्या या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला MCA बद्दल सर्व माहिती सांगणार आहोत. MCA full form in Marathi, MCA म्हणजे काय, MCA साठी पात्रता, MCA करण्यासाठी उत्तम विद्यापीठे इत्यादी सर्व माहिती आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत.
MCA full form in Marathi | एम सी ए फुल फॉर्म इन मराठी
MCA म्हणजेच “Masters in computer applications” होय. मराठीमध्ये याला आपण मास्टर्स ऑफ कम्प्युटर एप्लीकेशन असे म्हणू शकतो.
MCA म्हणजे काय? | What is MCA in Marathi
मित्रांनो एमसीए म्हणजेच, Masters of Computer applications. BCA (Bachelors of computer applications) हा कोर्स झाल्यानंतर तुम्ही MCA हा कोर्स करू शकता. MCA हा दोन वर्षांचा पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स आहे.
डिजिटल तंत्रज्ञान आणि कम्प्युटर एप्लीकेशन बद्दल सखोल ज्ञान या कोर्समध्ये पुरवले जाते. MCA हा कोर्स पूर्ण केल्यानंतर रोजगाराच्या बऱ्याच संधी तुम्हाला प्राप्त होतात.
कंप्यूटर एप्लीकेशनच्या सखोल ज्ञानाबरोबरच, यामध्ये तुम्हाला माहिती तंत्रज्ञान (IT ), प्रोग्रामिंग लँग्वेज, जावा प्रोग्रामिंग, क्लाऊड संगणक, ऑपरेटिंग सिस्टम, गणित इत्यादी विषयांचे ज्ञान तुम्ही प्राप्त करू शकता.
तुम्ही MCA डिग्री कशी प्राप्त करू शकता?
MCA पात्रता निकष | MCA Eligibility Criteria in Marathi
- विद्यार्थी हा भारतीय नागरिक असावा.
- इयत्ता दहावी आणि बारावी मध्ये तुम्हाला गणित विषयाबरोबरच 50% मार्क्स मिळवणे आवश्यक आहे.
- पदवी पूर्व अभ्यासक्रमात जसे की बीसीए, बीकॉम, बीएससी, यामध्ये तुम्हाला मिनिमम 55 टक्के मिळवणे अपेक्षित आहे.
- विविध विद्यापीठांचा निकष वेगळा असू शकतो त्याचबरोबर एमसीए ला ऍडमिशन देण्यापूर्वी विविध विद्यापीठांमध्ये प्रवेश परीक्षादेखील घेण्यात येऊ शकते.
प्रवेश परीक्षा :-
MCA प्रोग्राम मध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवेश परीक्षा द्याव्या लागू शकतात. जसे की CMAT (Common Management admission test) आणि NIT MCA.
प्रवेश परीक्षांसाठी तुम्हाला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सिस्टीम डेव्हलपमेंट, कंप्यूटर नेटवर्क्स, डेटाबेस मॅनेजमेंट, मल्टीमीडिया सिस्टम या विषयांचा अभ्यास करावा लागेल. यासाठी तुम्ही मॉक टेस्ट घेऊन देखील सराव करू शकता.
MCA चा अभ्यासक्रम | Syllabus of MCA in Marathi
दोन वर्षांचा कालावधी असलेल्या या कोर्समध्ये एकूण चार सेमिस्टर असतात. ज्यामध्ये पुढील अभ्यासक्रम शिकवला जातो.
- ऑपरेटिंग सिस्टम
- डेटाबेस मॅनेजमेंट
- प्रोग्राम फंडामेंट्ल
- कॉम्पुटर कम्युनिकेशन
नोकरीच्या संधी :-
MCA हा पोस्ट ग्रॅज्युएशन अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला खाजगी तसेच सरकारी क्षेत्रात नामवंत कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी प्राप्त होतात.
सरकारी कंपन्या जसे की गेल, एनटीपीसी, BHEL इत्यादी कंपन्यांमध्ये तुम्ही काम करू शकता. खाजगी कंपन्या जसे की टीसीएस, इन्फोसिस, IBM यामध्ये देखील तुम्ही Apply करून नोकरी प्राप्त करू शकता.
MCA पूर्ण झाल्यानंतर मिळणारे काही जॉब रोल्स :-
- सॉफ्टवेअर इंजिनिअर
- सिस्टम अनलिस्ट
- डेटा अनलिस्ट
- सायबर संरक्षण
- वेबसाईट डिझाइन
- सिस्टीम मॅनेजमेंट
- इन्फर्मेशन मॅनेजमेंट
- बँकिंग फील्ड
- इकोमर्स कंपनीज
- सरकारी संस्था
- डेटा कम्युनिकेश
- नेटवर्किंग सायन्स
MCA करण्यासाठी भारतातील काही नामवंत कॉलेजेस. :-
- BIT Mesra
- Jawaharlal Nehru University
- Motilal Nehru National Institute of Technology
- National Institute of Technology Tiruchirappalli
- NIT Rourkela
- PSG College of Technology
- Pune University Computer Science
- University of Hyderabad
धन्यवाद