नमस्कार मित्रांनो ,
आपल्यापैकी ज्या लोकांनी सरकारी जॉब्सची तयारी केली असेल. किंवा सरकारी बँकांसाठी परीक्षा दिल्या असतील त्या सर्वांना IBPS हे नाव माहिती असेल. IBPS SO, IBPS PO शब्द तुम्ही Advertisement मध्ये वाचले असतील. परंतु ह्या IBPS चा फुल फॉर्म तुम्हाला माहिती आहे का?
आजच्या या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला IBPS full form in Marathi, याबरोबरच IBPS म्हणजे काय ? IBPS कडून घेण्यात येणाऱ्या परीक्षा कोणत्या आहेत? आणि IBPS बद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत.
आय बी पी एस फुल फॉर्म इन मराठी | IBPS full form in Marathi
IBPS म्हणजेच “Institute of Banking personnel selection” (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन) होय. मराठीमध्ये आपण याला बँकिंग कर्मचारी निवड संस्था असे म्हणतो.
आता आयबीपीएस म्हणजे काय हे जाणून घेऊ.
IBPS म्हणजे काय?
IBPS म्हणजे Institute of Banking personnel selection होय. IBPS ही एक भारतातील स्वायत्त संस्था आहे जी भारतातील सगळ्या पब्लिक सेक्टर बँक आणि रिझर्व बँक ऑफ इंडिया साठी भरती परीक्षा घेत असते. पब्लिक सेक्टर बँक मधील फक्त SBI ( State Bank of India) वगळता इतर सर्व बँकातील कर्मचाऱ्यांची भरती ही IBPS ने घेतलेल्या परीक्षेतून होते.
विविध बँकांमधील सर्वश्रेणीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भरती ही IBPS ने घेतलेल्या परीक्षेमधून होत असते.
IBPS दरवर्षी वेगवेगळ्या परीक्षांचे आयोजन करते, त्यातील काही परीक्षा आता आपण पुढे जाणून घेऊ.
IBPS कडून घेण्यात येणाऱ्या परीक्षा :-
IBPS PO/MT EXAM: IBPS PO म्हणजेच Probationary Officer आणि IBPS MT म्हणजेच management trainee या दोन पदांसाठी ही परीक्षा घेतली जाते.
IBPS SO EXAM: Specialist officer या पदाच्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी ही परीक्षा घेतली जाते.
IBPS clerk exam: बँकातील लिपिक (clerk) पदांसाठी ही भरती परीक्षा घेतली जाते.
IBPS RRB exam: भारतीय रिझर्व बँकेतील Regional Rural Banks Officers या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी ही परीक्षा घेतली जाते. त्याचबरोबर office assistant पदासाठी ही परीक्षा घेतली जाते.
IBPS भरती प्रक्रिया कशी होते?
IBPS recruitment process: सर्वप्रथम आयबीपीएस च्या official वेबसाईटवर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागते.
IBPS ही प्रत्येक परीक्षेसाठी स्वतंत्र वेळापत्रक जाहीर करते. तुम्ही इच्छुक असलेल्या परीक्षेसाठी ONLINE अर्ज करू शकता.
IBPS ही परीक्षा तीन टप्प्यांमध्ये होते.
- टीयर- 1 (prelims)
- टियर – 2 (mains)
- मुलाखत (interview)
पहिल्या टप्प्यामध्ये पास झाल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या टप्प्यातील एक्झाम देता येते. पहिल्या दोन परीक्षा व नंतरची मुलाखत झाल्यानंतर सिलेक्ट झालेल्या कॅंडिडेट्स ची लिस्ट लावण्यात येते.
IBPS PO, IBPS SO, IBPS RRB officer scale या परीक्षांसाठी तुम्हाला वरील तिन्ही टप्पे द्यावे लागतात. परंतु, IBPS CLERK, IBPS RRB office assistant या परीक्षांसाठी तुमची मुलाखत घेतली जात नाही.
IBPS eligibility criteria in Marathi | IBPS पात्रता निकष
परीक्षार्थी भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
कोणत्याही शासनमान्य विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे.
वेगवेगळ्या परीक्षांसाठी असणारी वयोमर्यादा खालील प्रमाणे:
- IBPS PO – 20 ते 30 वर्षे
- IBPS SO – 20 ते 30 वर्षे
- IBPS Clerk – 20 ते 28 वर्षे
IBPS RRB –
- Officers Scale I – 18 ते 30 वर्षे
- Officers Scale II – 21 ते 32 वर्षे
- Officers Scale III – 21 ते 40 वर्षे
- Office Assistant (Multipurpose) – 18 ते 28 वर्षे.
SC-ST साठी ५ वर्षे, अपंगांसाठी १० वर्षे वयामध्ये सूट दिली जाते.
धन्यवाद