एसआयपी म्हणजे काय? | SIP Full form in Marathi
सध्या एसआयपी खूप चर्चेचा विषय बनलेला आहे. तुम्ही मित्रांसोबत किंवा तुमच्या ऑफिसमध्ये सहकाऱ्यांसोबत बोलताना एसआयपी बद्दल नक्की ऐकलेच असेल. पण तुम्हाला या एसआयपी बद्दल माहिती आहे का? तसेच एसआयपी मध्ये इन्व्हेस्ट करताना फंड कसे सिलेक्ट करायचे? एसआयपी मध्ये किती इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे? एसआयपी साठी पैसे कुठून पेमेंट करायचं यासंबंधीचे सर्व प्रश्न तुम्हाला आजच्या लेखामध्ये मी घेणार आहे.
सर्वात प्रथम जाणून घेऊया एसआयपी काय आहे.
What is SIP in Marathi
SIP म्हणजे “Systematic Investment Plan” ज्याला मराठीमध्ये “पद्धतशीर गुंतवणूक योजना” असे म्हटले जाते. एसआयपी हा अशा प्रकारचा एक प्लॅन असतो ज्यामध्ये आपण प्रत्येक महिन्याला आपण नोंद केलेल्या महिन्याच्या त्या दिवसाला पैसे इन्व्हेस्ट करत असतो. ती पैशाची इन्व्हेस्टमेंट 500 पासून पुढे कितीही रुपयांची असू शकते.
मित्रांनो एसआयपी एक इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी आहे, ज्याच्या मदतीने आपण म्युचल फंड द्वारे स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. यामध्ये आपण आपल्या पैशाच्या इन्व्हेस्टमेंट साठी एक्सपर्ट चे सहायता घेतो. ज्याला फंड मॅनेजर असे म्हटले जाते, हा फंड मॅनेजर खूप अभ्यासू आणि कुशल असतो, जो त्याच्या अभ्यासानुसार आपले पैसे चांगल्या स्टॉक्स मध्ये इन्वेस्ट करतो, ज्या बदल्यात तो तुम्हाला जो काही प्रॉफिट होईल त्यातले काही पर्सेंटेज स्वतःकडे ठेवतो.
म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी द्वारे इन्व्हेस्टमेंट कशी करायची?
सर्वात प्रथम तुमच्याकडे डिमॅट अकाउंट असणे गरजेचे आहे. डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी तुम्ही Zerodha, Upstox यांसारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करू शकता. एकदा का तुमचा डिमॅट अकाउंट बनला की तुम्ही या वरील ॲप्लिकेशनवर जाऊन एसआयपी बुक करू शकता, त्यानंतर तुम्ही तुमचा फंड सिलेक्ट करा. आता तुम्ही तुमची एसआयपी बनवा, याचा अर्थ असा आहे की तुम्हाला त्या फंड मध्ये एक अमाऊंट टाकावी लागेल, हि अमाऊंट तुमच्या सिलेक्ट केलेल्या तारखेला तुमच्या बँकेतून कट होईल. उदाहरणार्थ तुम्ही प्रत्येक महिन्याच्या 25 तारखेला ₹1000 चे एसआयपी करत आहात. तर तुमच्या खात्यामधून प्रत्येक महिन्याच्या 25 तारखेला ₹1000 एसआयपी मध्ये जमा होतील. तसेच यामध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही एसआयपी सुरू केल्यानंतर ती केव्हाही बंद करू शकता, किंवा कदाचित तुम्हाला थोड्याच पैशांची गरज असेल तर तुम्ही तुमच्या एसआयपी मधील थोडे पैसे घेऊन तुम्ही एसआयपी पुढे चालू ठेवू शकता.
एसआयपी मध्ये किती वर्षांसाठी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे?
जर तुम्ही एसआयपी मध्ये इन्व्हेस्टमेंट करताय तर तुम्ही कमीत कमी 20-25 वर्षांसाठी एसआयपी केले पाहिजे. कारण एसआयपी चा जो compounding (चक्रवाढ) इफेक्ट असतो तो तुम्हाला 20 वर्षानंतर बघायला मिळतो. जर तुम्ही एक-दोन वर्षाचा विचार करून एसआयपी करत असाल तर प्लीज एसआयपी करू नका. तुम्ही SIP Calculator चा वापर करून सुद्धा पाहू शकता कि तुम्ही केलेल्या SIP चे तुम्हाला काही वर्षांनंतर किती फायदा होऊ शकतो.
SIP फंड कोणते चांगले आहेत?
सध्या भारतात एसआयपी मध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी हे पाच फंड खूप चांगले आहेत.
1. HDFC फ्लेक्सी कॅप फंड
2. निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड
3. पराग पारिख फ्लेक्सी कॅप फंड
4. HDFC मिड-कॅप फंड
5. ICICI प्रू ब्लूचिप फंड
वरील दिलेल्या फंड व्यतिरिक्त तुम्ही इतर फंड देखील सिलेक्ट करू शकता फक्त फंड सिलेक्ट करताना त्या fund ने मागील 5-10 वर्षात किती % ने रिटर्न्स दिलेले आहेत ते नक्की पहा. सोबत त्या fund ला मॅनेज करण्यासाठी expense ratio, exit charges किती आहे हे नक्की पहा.
तर मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला आता एसआयपी बद्दल संपूर्ण माहिती समजली असेल. आणि तुम्ही अजून सुद्धा एसआयपी सुरू केली नसेल तर एक मित्र म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो जेवढं होईल तेवढे लवकर एसआयपी मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करा. तुम्हाला एसआयपी संबंधी काही शंका असतील तर खाली कमेंट करून मला नक्की विचारा.